मोठी अपडेट! राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना 58% डी.ए चा लाभ जानेवारीपासून

मोठी अपडेट! राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना 58% डी.एचा लाभ जानेवारीपासून

राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचारी व पेन्शनधारकांना 3 टक्के वाढीव महागाई भत्ता (DA) मंजूर होण्याची शक्यता असून, हा वाढीव डी.ए 58 टक्के दराने लागू केला जाणार आहे. ही वाढ जानेवारी महिन्याच्या वेतन किंवा पेन्शन देयकासोबत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारी, निमसरकारी (जिल्हा परिषद) तसेच इतर पात्र कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. मात्र सध्या राज्यात विविध ठिकाणी निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने या निर्णयास थोडा विलंब होत आहे. अलीकडेच नगरपरिषद व नगरपंचायतींचे निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाले असून, येत्या महिन्यात महानगरपालिकांचे निवडणूक कार्यक्रम 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत.

या निवडणूक आचारसंहितेमुळे महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) तात्काळ जाहीर होऊ शकलेला नाही. त्यामुळे डी.ए वाढीचा अंतिम निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरीस निर्गमित होण्याची शक्यता आहे. परिणामी, जानेवारी महिन्याचा पगार किंवा पेन्शन जो फेब्रुवारी महिन्यात देय होतो, त्यासोबतच वाढीव डी.ए लागू केला जाईल. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना डी.ए वाढीसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 01 जुलै 2025 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला जाणार आहे. यासोबतच, जुलै 2025 पासूनची महागाई भत्ता फरकाची (थकबाकी) रक्कम देखील कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे डी.ए वाढ लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.

दरम्यान, महागाई भत्ता वाढीबाबत राज्यातील वर्ग-4 कर्मचारी संघटनांच्या वतीने राज्य सरकारकडे निवेदन पत्र सादर करण्यात आले आहेत. या संघटनांनी केंद्र सरकारप्रमाणे तात्काळ डी.ए वाढ लागू करण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून डी.ए वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

एकूणच, निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे निर्णयाला थोडा विलंब होत असला तरी राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे 3 टक्के वाढीव महागाई भत्ता आणि त्याची थकबाकी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे येत्या काळात राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे.

Leave a Comment