राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात मिळणार हे 03 आर्थिक लाभ

राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात मिळणार हे 03 आर्थिक लाभ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. या महिन्यात कर्मचाऱ्यांना तीन महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळणार असून, त्यामुळे त्यांच्या एकूण पगारात चांगली वाढ होणार आहे.

१) महागाई भत्त्यात (DA) वाढ

जानेवारी महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांना ३ टक्के महागाई भत्ता वाढ मिळण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा एकूण डीए ५५ टक्क्यांवरून थेट ५८ टक्के होणार आहे. ही वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर देण्यात येणार आहे.

२) महागाई भत्ता थकबाकी मिळणार

महागाई भत्ता १ जुलै २०२५ पासून लागू मानला जाणार असल्याने, त्या तारखेपासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. ही थकबाकी जानेवारी महिन्याची असून, फेब्रुवारीमध्ये मिळणाऱ्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

३) प्रोत्साहन भत्त्याचा फरक अदा होणार

राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या नियमानुसार, आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो. हा भत्ता मूळ वेतनाच्या १५ टक्के इतका असून, किमान २०० रुपये आणि कमाल १५०० रुपयांच्या मर्यादेत असतो.

हा प्रोत्साहन भत्ता सहाव्या वेतन आयोगापासून लागू असल्याने, १ जानेवारी २००६ पासूनचा फरक कर्मचाऱ्यांना अदा केला जाणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment