आठवड्यात सोने-चांदी दरात मोठी घसरण! सोनं 4,000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे नवे दर जाणून घ्या”

Gold Silver Rate update 2026 : सोने आणि चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात सोन्याचे दर 4000 रुपयांनी कमी झाले तर चांदीचे दर 3000 रुपयांनी कमी झाले आहेत. 2025 या वर्षात सोने आणि चांदीच्या दरांनी मोठी झेप घेतली होती. या दोन्ही मौल्यवान धातूंनी विक्रमी उच्चांक गाठले. मात्र, वर्षाच्या अखेरच्या काही दिवसांत परिस्थिती बदलली आणि सोने-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण पाहायला मिळाली. हीच घसरण 2026 च्या सुरुवातीच्या दिवसांतही कायम आहे.

गेल्या एका आठवड्याचा विचार करता, सोन्याच्या दरात सुमारे ४ हजार रुपयांची घट झाली आहे. तर चांदीचे दरही ३ हजार रुपयांनी खाली आले आहेत.

सोन्याच्या दरात मोठी घसरण

2025 च्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दरात जोरदार घसरण झाली आणि हीच ट्रेंड 2026 च्या पहिल्या आठवड्यातही सुरू राहिल्याचे दिसून येते. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर एकूण ४,१२१ रुपयांनी घसरले आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 26 डिसेंबर 2025 रोजी 5 फेब्रुवारी वायद्याच्या 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,39,873 प्रति 10 ग्रॅम इतका होता. त्यानंतर सतत घसरण होत 2 जानेवारी 2026 रोजी हा दर ₹1,35,752 प्रति 10 ग्रॅम पर्यंत खाली आला आहे.

दरम्यान, सोन्याने अलीकडेच ₹1,40,456 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या पातळीवरून पाहता, आतापर्यंत सोन्याचे दर जवळपास ₹4,704 ने स्वस्त झाले आहेत.

चांदीच्या दरातही घट

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात एकूण ₹3,188 ची घट झाली.

26 डिसेंबर 2025 रोजी MCX वर चांदीचा दर ₹2,39,787 प्रति किलो होता. त्याआधी थोडीशी वाढ दिसून आली होती, मात्र नंतर घसरण होत दर ₹2,36,599 प्रति किलो इतका झाला.

जर चांदीच्या उच्चांकाकडे पाहिले, तर एक किलो चांदीचा दर ₹2,54,174 पर्यंत पोहोचला होता. त्या तुलनेत सध्या चांदीचे दर तब्बल ₹17,575 ने कमी झालेले आहेत.

2025 मध्ये दरवाढीमागील प्रमुख कारणे

2025 मध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होण्यामागे जागतिक पातळीवरील आर्थिक आणि राजकीय अस्थिरता हे मुख्य कारण ठरले. आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि दर चढतात.

दुसरीकडे, चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा आणि इतर तंत्रज्ञान क्षेत्रात चांदीची मागणी वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा मर्यादित राहिल्याने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली.

Leave a Comment