खुशखबर : जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा डी.ए. 2% ने वाढणार
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात (DA) पुन्हा 2 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मिळणारा डी.ए. 58 टक्के असून, वाढीनंतर तो थेट 60 टक्क्यांवर जाणार आहे.
सध्या किती डी.ए. मिळतो?
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जुलै 2025 पासून 58 टक्के डी.ए. दिला जात आहे.
जानेवारी 2026 पासून काय बदल होणार?
उपलब्ध आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून किमान 2 टक्के डी.ए. वाढ लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 60 टक्के होईल.
डी.ए. वाढ कशावर ठरते?
महागाई भत्त्याची वाढ ही ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI) या निर्देशांकावर आधारित असते.
सध्या ऑक्टोबर 2025 पर्यंतचे निर्देशांक जाहीर झाले आहेत, मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 चे आकडे अजून जाहीर व्हायचे आहेत.
हे दोन्ही निर्देशांक जाहीर झाल्यानंतरच सरकारकडून डी.ए. वाढीची अधिकृत घोषणा केली जाईल.
आत्ताच्या अंदाजानुसार…
सध्याच्या उपलब्ध आकडेवारीचा विचार करता, जानेवारी 2026 पासून 2 टक्के डी.ए. वाढ निश्चित मानली जात आहे. त्यामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.